लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन
पनवेल दि.१८ (संजय कदम) : थोर समाजसुधारक, लेखक, लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महेश साळुंखे दरवर्षी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. त्यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण, मोफत वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गणवेश वाटप, रुग्णालयात फळे वाटप, अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. याअंतर्गत महेश साळुंखे यांच्या ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महेश साळूंखे यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने