स्वर्गीय गोपाळ वर्तक यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.








स्वर्गीय गोपाळ वर्तक यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.

उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्ह्यातील उरण पूर्व विभागातील प्रसिद्ध निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल वर्तक यांचे वडील, गोवठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच स्वर्गीय गोपाळ आलोजी वर्तक ऊर्फ आप्पा यांच्या स्मृती दिनानिमित्त गोवठणे विकास मंच आणि समर्पण ब्लड सेंटर यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते



.या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पारधे, नरेश शेंडे, संतोष थळे मुंबई,माजी उपसरपंच विक्रांत वर्तक,समीर म्हात्रे, साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश म्हात्रे,कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, पत्रकार नंदकुमार तांडेल, सीएचए संघटनेचे अध्यक्ष रुपेश भगत, सुषमा म्हात्रे, निगा फाउंडेशनचे निलेश गावंड, प्रा.शिक्षक अजित जोशी यांसह रक्तदान चळवळीत सक्रीय संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व उरण तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. हे भव्य रक्तदान शिबिर स्वर्गीय गोपाळ आलोजी वर्तक सभामंडप गोवठणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.एकूण 57 रक्तदान झाले. 




वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ अनेकजण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवितात मात्र सुनील वर्तक यांनी आरोग्य क्षेत्रातील होत चाललेला रक्ताचा तुटवडा, रक्ताची वाढती मागणी, ईमरजन्सी च्या वेळेत रक्ताचा होत असलेला अपुरा रक्त पुरवठा, रक्त वेळेत न मिळाल्याने अनेकांचे होणारे मृत्यू आदी गोष्टींचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन आले होते. आणि या शिबिराला जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात संपूर्ण दिवसभर रायगड भूषण नितेश पंडित, जीवन डाकी, राजेंद्र भगत, हेमाली म्हात्रे, चेतन पाटील आदींनी निवेदन केले



थोडे नवीन जरा जुने