अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित नवीन शेवा केंद्राचा शुभारंभ.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर व मालती भोईर यांची प्रमुख उपस्थिती.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर एम आय पी एल चे व्यवस्थापक दयाळशेठ भोईर यांच्या सहकार्याने उरण तालुक्यातील नवीन शेवा मध्ये बांधण्यात आलेल्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित नवीन शेवा केंद्राचे शुभारंभ करण्यात आला
सदर वेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व मालती मनोहर भोईर यांच्या हस्ते विधिवत पूजा, होमहवन व आरती करण्यात आली, या कार्यक्रमातस सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून पूजा व मंत्रघोषात अतिशय भक्ती भावाने या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
सदर वेळी नवीन शेवा स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख कार्यकर्ते सुहास गवस, दिनेश घरत व विद्या म्हात्रे यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, मालती भोईर व दयाळशेठ भोईर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्री स्वामी समर्थांचे भक्तगण उपस्थित राहून अतिशय भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
Tags
उरण