डाऊर नगर शाळेत वातावरण जनजागृती कार्यशाळाडाऊर नगर शाळेत वातावरण जनजागृती कार्यशाळा
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे ) बदलत्या वातावरणाचा जनजीवनावर होणारा परिणाम या बाबत भावी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद डाऊरनगर शाळेत प्रकृती आणि
 सी.ए.सि.आर एन जी ओ यांच्या सौजन्याने इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे ऑगस्ट 2023 पर्यत चार भाग होतील व शेवटी मुलांची एक उत्तर चाचणी देखील घेतली जाईल अशी माहिती समन्वयक गीता म्हात्रे यांनी दिली.कार्यशाळेच्या पहिल्या भागात श्वेता आधावडे,शितल पटेल,वैष्णवी व-हाडे,यांनी हवामान व ऋतूबदल या विषयी प्रात्यक्षिका सहीत मुलांना माहिती दिली.तसेच मुलांची पूर्व चाचणी घेतली.थोडे नवीन जरा जुने