पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश जितेकर माजी उपसभापती देविदास पाटील भाजपात पनवेलमध्ये शेकाप व उबाठा गटाला मोठा हादरा





पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश जितेकर माजी उपसभापती देविदास पाटील भाजपात 
पनवेलमध्ये शेकाप व उबाठा गटाला मोठा हादरा 



पनवेल(प्रतिनिधी) पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व शेकापचे ज्येष्ठ नेते प्रकाश जितेकर तसेच माजी उपसभापती व उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते देविदास पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत शेकाप व उद्धव ठरे गटाला मोठा हादरा दिला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मुंबईत प्रवेश केला. 


   यावेळी उद्योजक मंगेश लबडे, रवींद्र जितेकर, दयानंद जितेकर, अनुज जितेकर, दीपक डाऊर, निलेश गायकवाड यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते के. ए. म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, प्रवीण खंडागळे, तानाजी पाटील, सुनील माळी, अविनाश गाताडे, विद्याधर मोकल, प्रवीण ठाकूर, ज्ञानेश्वर सुर्वे, मनोज पवार, महादेव कांबळे, जीवन टाकले, रोशन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.  प्रकाश जितेकर हे दापोली ग्रामपंचायतीचे १५ वर्षे सरपंच राहिलेले व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्यासोबत कार्य केलेले कै. रघुनाथ जितेकर यांचे सुपूत्र आहेत. त्यांचा आदर्श घेऊन प्रकाश जितेकर कार्यरत राहिले.त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. तर देविदास पाटील हे युवकांची ताकद असलेले खंबीर कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. त्यांनी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले आहे. 

पनवेलमध्ये शेकापच्या काही मतलबी आणि आयत्या संधीसाधू पुढाऱ्यांमुळे शेकापमध्ये दुफळी निर्माण होऊन शेकापची वाताहत झाली आहे. उरला सुरलेला शेकाप फक्त शायनिंग मध्ये गुरफटला आहे. अशी चर्चा पनवेलमध्ये होत आहे. 


थोडे नवीन जरा जुने