पावसामुळे साठलेल्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह


पावसामुळे साठलेल्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह 
पनवेल दि. 23 ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील कसळखंड येथे असलेल्या बसस्टॉपच्या पाठी मागील बाजूस पावसामुळे साठलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळला परिसरात खळबळ उडाली असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत .                    सदर महिलेचे अंदाजे वय ( ४० ते ४५ ) वर्ष ,डोक्यावरील केस काळे असून तिच्या अंगात निळ्या रंगाचे फुल टीशर्ट व त्याच्या आतमध्ये लाल रंगाची काळे ठिपके असलेली मॅक्सी घातलेली आहे . या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे फो. नं . - ०२२-२४७५२४४४ किंवा पोलीस निरीक्षक लाला लोणकर मो. ८०८७२५७७११ येथे संपर्क साधावा . 


थोडे नवीन जरा जुने