मोटारसायकलीची चोरी







मोटारसायकलीची चोरी
पनवेल दि १५, ( संजय कदम) : हिरो कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने तालुक्यातील बंबावीपाडा येथून चोरून नेल्याची घटना घडली आहे. 



               राहुल गुप्ता याने त्याची वीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एमएच ४६ बीडब्लू ३९७० ही बंबावीपाडा  येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने