दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा- कृती समितीची मागणी






दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा- कृती समितीची मागणी 
९ ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लावणार नामफलक 



    
पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे,त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करुन घ्यावा, अशी एकमुखी मागणी येथे झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आली.



     लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीच्या मुंबई ,नवी मुंबई,रायगड,ठाणे,पालघर,नाशिक आदी जिल्ह्यांतील कार्यकत्योंची सभा शनिवारी दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल,उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली त्यावेळी सभेतील सर्व वक्त्यांनी ही मागणी केली.



        दि.बा.पाटील यांचे नाव या विमानतळाला द्यावे,असा ठराव राज्य सरकारने विधिमंंडळाच्या दोन्ही सभागृहात करुन आज वर्षभराचा काळ उलटून गेला आहे. राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घेतला नाही, त्यामुळे मुंबई ,नवी मुंबई,रायगड,ठाणे,पालघर,नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला आहे.राज्य सरकारने या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करुन हा ठराव त्वरीत केंद्राकडे पाठवून तो मंजूर करून घ्यावा.याबाबतचे एक निवेदन कृती समितीतर्फे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लवकरच त्यांची भेट घेऊन देण्याचे ठरले.यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी येत्या ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा नामफलक समितीतर्फे लावण्यात येईल,असेही ठरविण्यात आले.
        तसेच दि.बा.पाटील विमानतळ नामकरण आंदोलनात भाग घेतलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे,यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणारे निवेदन देण्याचेही ठरले.
     या सभेस दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जे.एम.म्हात्रे, सरचिटणीस भूषण पाटील, दीपक म्हात्रे, चिटणीस राजेश गायकर, खजिनदार जे.डी.तांडेल, विनोद म्हात्रे, गुलाब वझे, संतोष केणे, दशरथ भगत, मनोहर पाटील, सुशांत पाटील, रूपेश धुमाळ, अतुल पाटील, मधुकर भोईर, विजय गायकर, डी.बी.पाटील आदी मान्यवर सभेस उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने