भाजपनेते किरीट सोमय्या यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्यावतीने निषेध; किरीट सोमय्या यांच्या फोटोला महिलांनी केले जोडो आंदोलन
पनवेल दि.१८(वार्ताहर): भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेले कृत्य हे अश्चिल असून, जगासमोर आले आहे. तसेच सोमय्याच्या सेक्स स्कॅडलच्या तब्बल ३५ व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून, या स्कॅडलमुळे महाराष्ट्रात सर्वत्र छी तू केली जात असून, महिला वर्ग अत्यंत तीव्र नाराजी व संताप व्यक्त करीत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात व शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेपार्ह केलेल्या कृत्याची चौकशी करून, योग्य ती कारवाई करावी याकरिता जाहीर निषेध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत नेतृत्वाखाली तसेच शिवसेना महिला आघाडी पनवेल विधानसभा वतीने करण्यात आला.
यावेळी पनवेल उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, महानगर संघटक शशिकांत डोंगरे , डी.एन. मिश्रा, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, शहप्रमुख राकेश गोवारी,सदानंद शिर्के, सूर्यकांत म्हसकर, महिला उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संघटिका अनीता डांगरकर, उपतालुका संघटिका मीना सादरे, उपमहानगर संघटिका सौ. रीना पाटील, शहर संपर्क संघटिका रत्नमाला शिंदे, शहर संघटिका सानिका मोरे, रूपाली कवळे, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
पनवेल