रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या अध्यक्षपदी रो राजेंद्र मोरे आणि सचिवपदी रो सतीश पावसे यांची निवडरोटरी क्लब ऑफ पनवेल च्या अध्यक्षपदी रो राजेंद्र मोरे आणि सचिवपदी रो सतीश पावसे यांची निवड
पनवेल दि.११ (संजय कदम) : रोटरी क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी रो राजेंद्र मोरे यांनी सूत्रे हाती घेतली तसेच क्लब च्या सचिवपदी रो सतीश पावसे यांची निवड करण्यात आली. याबद्दल मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.               आगामी काळात नद्यांचे पुनरुज्जीवन, वृद्धाश्रम, आरोग्य जनजागृती, शिक्षण क्षेत्रात विविध समाज उपयोगी प्रकल्प, अंगणवाडी, रोजगानिर्मिती तसेच पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत असे अध्यक्ष रो राजेंद्र मोरे यांनी सांगितले. पदग्रहण सोहळ्या साठी प्रमुख अतिथी म्हणून भावी प्रांतपाल रो संतोष मराठे आणि सहायक प्रांतपाल रो ऋतुजा भोसले, आणि क्लब चे मान्यवर सदस्य आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने