सीएसआर फंडातून जेएनपीएने इर्षाळवाडीचे पुनर्वसन करावे.




सीएसआर फंडातून जेएनपीएने इर्षाळवाडीचे पुनर्वसन करावे.
जेएनपीटी जनरल कामगार संघटनेची जेएनपीए प्रशासनाकडे मागणी.




उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रात्री २२.३० वाजता इर्षाळवाडी, तालुका कर्जत, - जिल्हा - रायगड येथे दरड कोसळून संपुर्ण गाव दरडीखाली दबले त्यात एकूण ४३ कुंटुंबातील अंदाजे २२८ लोकांपैकी २७ लोकांचे मृतदेह सापडले तर ५७ लोक बेपत्ता झालेली आहेत. तसेच १४१ लोक जिवंत सापडलेले आहेत. त्यांना तात्पुरत्या स्वरुपात चौक येथे कन्टेनर मधे ठेवण्यात आलेले आहेत.त्यामुळे जे. एन. पी. ए. प्रशासनाने सी एस आर फंडातून मुक्काम - इशाळ वाडी, - तालुका - कर्जत, जिल्हा - रायगड येथील अंदाजे एकूण १४१ लोकांचे तातडीने कायम स्वरुपी संपूर्ण पुनर्वसन करावे अशी मागणी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा यांनी जवाहलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए ) कडे पत्रव्यवहाराद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून केली आहे



.यावेळी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत यांनीही इर्षाळवाडीची दुर्घटना किती भयानक आहे तसेच त्या दुर्घटना ग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन करणे किती महत्वाचे हे जेएनपीएचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांना पटवून दिले.जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत,सेक्रेटरी जनार्दन बंडा यांची बाजू एकूण घेउन डेप्युटी चेअरमेन उन्मेष वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इर्षाळवाडीतील दुर्घटना ग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी लवकरच योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.


थोडे नवीन जरा जुने