ऑनलाईन फ्रॉड करून फसवणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी गेले गजाआड





ऑनलाईन फ्रॉड करून फसवणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी गेले गजाआड; ४० हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगतऑनलाईन फ्रॉड करून फसवणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी गेले गजाआड; ४० हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
पनवेल दि.२६(संजय कदम): एक अनोळखी इसमाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा देतो असे वेळोवेळी सांगुन आकाश गायकवाड यांची ३ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेले २ मोबाईल फोन व १ लॅपटॉप असा एकूण ४०,०००/ रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


आकाश गायकवाड (वय ३१) यांनी एका अनोळखी आरोपीने पृथा कुलकर्णी नावाचे फेसबुक अकाऊंटवरुन मेसेज व कॉल करुन तसेच मोबाईल वरून कॉल करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा देव असे वेळोवेळी सांगुन ३ लाख ७१ हजार रुपये गुंतविण्यास प्रवृत्त करुन सदरची रक्कम व त्यावरिल नफा यापैकी काहीएक न देता आर्थिक फसवणुक केली असल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.स कायदा कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.




 सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (प्रशा) दिलीप शिंदे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे अधिकारी सपोनि पालमपल्ले व पोलीस हवा बारवे, पो.कॉ.मेऱ्या यांनी गुन्हयातील उपलब्ध माहितीचे आधारे तांत्रीक तपास करुन अजित चव्हाण (वय २९ वर्षे रा. कळंबोली) या आरोपीस अटक केली. यावेळी त्याच्याकडून २ मोबाईल फोन व १ लॅपटॉप असा एकूण ४०,००० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीने या पूर्वीही अशाप्रकारचे महिलांचे नावाने फेक फेसबुक अकाऊंट बनवुन त्यावर महिलेचा फोटो अपलोड करुन त्याचा वापर करुन कोल्हापुर येथून २६ लाख, चिपळुन मधून १२ लाख ५० हजार, नागपूर येथून ३ लाख २५ हजार, पुणे येथून २० हजार आणि डोंबिवली, कल्याण येथून ४० हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.


थोडे नवीन जरा जुने