पनवेल दि.२६(संजय कदम): एक महिलेला लग्नाचे अमिश दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबध ठेवून तिला गर्भवती करून जबाबदारी नाकारणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराच्या या गंभीर गुन्हयाचा तपास ४ दिवसांच्या आत पूर्ण करून गुन्हयातील आरोपी विरुदध मा. न्यायालयात दोषारोपत्र दाखल केला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात एका महिलेने अनुज सुनिल वेदक (वय २९) याने हॅपन डेटिंग अॅपवरून ओळख करून त्यांना पनवेल येथे भेटण्यास बोलावून पनवेल येथील वृंदावन लॉजवर घेवून जावून तसेच लोणावळा येथील एका लॉजवर घेवून जावून त्यांचेशी लग्न करणार असल्याने सांगुन, त्यांचेसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरीक संबंध करून त्यांना गर्भवती केले. त्यानंतर त्यांचेशी लग्न न करता त्यांची व बाळाची जबाबदारी घेण्यास नकार देवुन शिवीगाळी व दमदाटी केली असल्याची तक्रार दाखल केली होती. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस उप आयुक्त, परि-२, पनवेल यांना दिली असता पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०२, पनवेल व मा. सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे
सुचनेनुसार तसेच पनवेल पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नितिन ठाकरे, पोलीस निरीक्षक, दिलीप शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहा पोलीस निरीक्षक वृषाली पवार व पोना प्रविण मेथे असे तपास पथक तयार करण्यात आले. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकाने गुन्हयातील आरोपी अनुज सुनिल वेदक याच्या बाबत तपास केला असता तो सध्या सानवी मार्हल्स, पुणे येथे राहत असल्याचे समजले. सदर ठिकाणाहून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेवून अटक केली. सदरच्या गंभीर गुन्हयातील आरोपीत याचेकडे तपास केला असता त्याने पनवेल व लोणावळा येथील लॉजवर गुन्हा केला असल्याचे सांगितल्याने तेथे जावून पुरावे प्राप्त करून पंचनामे करण्यात आले. तसेच गुन्हयातील फिर्यादी व आरोपी यांची गुन्हयाचे अनुशंगाने वैदयकीय तपासणी करून फिर्यादी, आरोपी व बाळाचे डी.एन.ए. सॅम्पल काढुन घेवून न्यायसह वैज्ञानिक प्रयोगशाळा, कलिना मुंबई येथे पाठविण्यात आले. सदर गुन्हयाचा अविरत चार दिवस तपास करून यर्थाथ किटचा वापर करून नमुद पथकाने आरोपी विरुदध पुरावे प्राप्त करून ४ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याचा तपास ४ दिवसांच्या आत पूर्ण करून आरोपी विरुदध न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आला आहे.
Tags
पनवेल