मोक्का लागलेल्या सराईत चेन स्नॅचरला आणि त्याच्या साथीदारांना पनवेल शहर पोलिसांनी केली अटक; १० गुन्हे आणले उघडकीस






मोक्का लागलेल्या सराईत चेन स्नॅचरला आणि त्याच्या साथीदारांना पनवेल शहर पोलिसांनी केली अटक; १० गुन्हे आणले उघडकीस
पनवेल दि.२६(संजय कदम): अजित बळीराम मोकळ हे त्यांची पत्नी, आई व दोन लहान मुलांसह रिक्षा मधुन प्रवास करीत असताना रिक्षाचे पाठीमागुन येणारी काळ्या रंगाच्या मोटार सायकल वरील दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने तक्रारदार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोडतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन पेंडलसह जबरीने हिसका मारुन चोरुन नेले होते. सदर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शिताफीने तपास करीत गुन्ह्यातील २ आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.


       या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे व अशोक राजपुत, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाचे परिसरातील सी. सी. टी. व्ही. कॅमेराची पडताळणी करुन व पोउपनि अभयसिंह शिंदे हे एम.पी. ए. नाशिक येथे प्रशिक्षणाकरिता असताना देखील त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त केली. प्राप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्निल केदार, पोउपनि किरण वाघ, पोउपनि नरेंद्र जगदाळे व १२ पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठांच्या परवानगीने अतिसंवेदनशील अशा आंबिवली, कल्याण येथील खडकपाडा स्थानिक पोलीसांच्या मदतीने कोबींग ऑपरेशन करुन गुन्हयातील आरोपी तन्वीर फैरोज हुसेन उर्फ इराणी उर्फ जाफरी(वय २३ वर्षे, रा. पाटील नगर गल्ली नं. ४ अंबिवली, कल्याण) यास ताब्यात घेतले.



 सदर आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने त्याचा सहकारी आरोपी अली जावेद इराणी याचेसह अनेक चेन स्नॅचींगचे गुन्हे केल्याचे सांगीतले. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपी अली जावेद इराणी याचा शोध घेणेकामी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल तालुका व कळंबोली, तळोजा या पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी अंबिवली येथे कोंबींग ऑपरेशन करुन आरोपी अली जावेद इराणी( वय २३) यास शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडे तपास केला असता आरोपी यांचेककडुन विविध ठिकाणी केलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत. 




सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सुपमा पाटील, सपोनि प्रकाश पवार, सपोनि स्वप्निल केदार, पोउपनि किरण वाघ, पोउपनि नरेंद्र जगदाळे, पोउपनि सुनिल गिरी, पनवेल तालुका पोलीस ठाणेचे सपोनि अविनाश पाळदे, पोउपनि हर्पल राजपुत, कळंबोली पोलीस ठाणेचे सपोनि राजेंद्र जाधव, तळोजा पोलीस ठाणेचे सपोनि नितीन शिरसाठ, खांदेशवर पोलीस ठाणेचे सपोनि पानसरे व पुरुष / महिला पोलीस अंमलदार यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि प्रकाश पवार हे करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने