प्राणीप्रेमी राजू मुंबईकरांनी वाचविले मोराचे प्राण.






प्राणीप्रेमी राजू मुंबईकरांनी वाचविले मोराचे प्राण.
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) दि . 10/7/2023 रोजी सकाळी 9 वाजता उरण तालुक्यातील रानसई आदिवासीवाडी येथे काही कामानिमित्त जात असताना जंगलातील रस्त्याच्या बाजूला झाडाचा आधार घेत बसलेला एक शांत बसलेला मोठा मोर निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी म्हणून परिचित असलेल्या राजू मुंबईकर यांना दिसला

.राजू मुंबईकर त्या मोराच्या जवळ गेले असता तो उडत नव्हता.आणि मग कर्नाळा आर एफ ओ राठोड सर यांना याबाबत राजू मुंबईकरांनी कल्पना दिली आणि लगेच फॉरेस्टर वारगे दादा यांना पाठवले.





 व लगेच मोर मेडिकल साठी नेला असता त्याला आराम द्यायला सांगितले आणि त्याची रवानगी लगेच कर्णाळा पक्षी अभयअरण्यात करण्यात आली आहे.आणि सध्या तो मोर सुखरूप आहे. मोराचे प्राण वाचविल्याने सर्व फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी केअर ऑफ नेचरच्या सर्व रेस्क्यू टीमचे आभार मानले.वेळेवर उपचार मिळाल्याने मोर वाचल्याने केअर ऑफ नेचर या सामाजिक व निसर्गप्रेमी संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी आर एफ ओ राठोड सरांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सोबत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र चे सचिव विलास ठाकूर .आर एफ ओ राठोड सर, फॉरेस्टर वारजे सर उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने