पनवेल दि.०८ (संजय कदम) : आई सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि खारघर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख गुरूनाथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद नवीन शाळा ओवे मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले.
आई सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि खारघर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख गुरूनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद नवीन शाळा ओवे मधील विद्यार्थ्यांना पेन्सिल, पेन, कंपास असे शैक्षणिक साहित्याचे तसेच वह्या वाटप करण्यात आले. यावेळी खारघर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख गुरूनाथ म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा पाटील, केळवणे ग्रामपंचायत सदस्य विनायक गावंड, मुख्याध्यापक धुमाळ मॅडम, परवीन गारी, हलिमा कुरेशी, रेश्मा शेख, रुपेश सुतार, रुपाली केवाले-संपदा, वैशाली, कमलाताई तसेच शिवसेना महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी व आई सेवा भावी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
पनवेल