कृषी दिन उत्साहात साजरा






कृषी दिन उत्साहात साजरा 


पनवेल(प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पनवेल पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आलेला कृषी दिन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. 



यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पिक विमा योजना, शेतकरी उत्पादक कंपनी, पनवेल कृषि फेसबुक पेज तयार करणे, अत्याधुनिक पद्धतीने शेती पद्धती, कॅसर फंड, एकात्मिक शेती पद्धती इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषि अधिकारी शरद गिते यांनी अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, एक रुपयात पिक विमा योजना, स्मार्ट अंतर्गत कंपनी तयार करणे, फळबाग लागवड इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.



 तर कृषि अधिकारी तानाजी दोलतोडे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी पर्यवेक्षक श्रीकृष्ण सुरवसे यांनी केली. प्रगतशील शेतकरी आत्माराम हातमोडे, उदय झिंगे, रुपेश पवार यांनी आपल्या शेतात येणाऱ्या अडचणी व आपल्या शेतातील अनुभव बाबत मार्गदर्शन केले.




यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकारी प्रसाद पाटील, अलका बुरकूल, संगीता पाटील, मनीषा वळसे, नमिता वाळके, तहसीलदार पनवेल कार्यालयातील सानिका पाटील, पूजा पाटील, भरत जगदाळे, पनवेल पंचायत समिती कार्यालयातील रमेश तारेकर, राजश्री पाटील या कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी संजय भोये, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील तसेच ४०० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते.





थोडे नवीन जरा जुने