श्री साई मंदिर वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.






श्री साई मंदिर वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )
गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे गुरु शिष्याचा दिवस. हा दिवस शिष्य वर्ग गुरु प्रती आदर राखत मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक सोमवार 3/7/2023 रोजी श्री साई देवस्थान साई नगर वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .



सकाळी 6 वाजता काकड आरती, सकाळी साडे सहा वाजता गुरुवर्य श्री मो. का. मढवी यांच्या शुभहस्ते बाबांचे मंगल स्नान, दुपारी 12 वाजतां मध्यान्ह आरती, दुपारी साडे बारा ते 3 वाजे पर्यंत महाप्रसाद,अन्नदाते रवींद्र काथोर पाटील, अध्यक्ष श्री साई देवस्थान वहाळ यांच्या माध्यमातून हे अन्नदान करण्यात आले.सायंकाळी पाच ते साडे पाच ओम साई सेवा मंडळ चिरनेर पायी दिंडी चे आगमन झाले व देवस्थान तर्फे दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.



सायंकाळी धुपारती, सायंकाळी 6.30 वाजता गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ कोपर यांचे सुश्राव्य भजन झाले.गायिका सुप्रिया ठाकूर घरत, पखवाज तुषार घरत (चिलें ),तबला अँड. मिलिंद कडू (खारघर ), टाळ जितुबुवा घरत (चिलें ), उन्मेष गावंड (बोरखार ) यांची भजनाला साथ लाभली.सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या वेळी गुरु पौर्णिमा निमित्त मंदिर दर्शना करिता रात्र भर खुले होते.भाविक भक्तांनी रांगेत शिस्तीने उभे राहून साई दर्शन घेतले.



श्री साई मंदिर, साई नगर, वहाळ देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी व देवस्थानच्या सर्व टीमने सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.एकंदरीत श्री साई मंदिर, साई नगर, वहाळ येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरु पौर्णिमा मोठया भक्ती भावाने, धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात संपन्न झाली.

उदे

थोडे नवीन जरा जुने