पनवेल बाजारपेठेत मक्याच्या कणसांची वाढली आवक






पनवेल बाजारपेठेत मक्याच्या कणसांची वाढली आवक
पनवेल दि.०७ (वार्ताहर) : पावसाळा सुरू झाला असल्याने मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. त्यानुसार पनवेलच्या बाजारात कणसांची आवक वाढत आहे. सध्या बाजारात एक कणीस १० रुपयांना मिळत आहे.



           पावसाळा हा मक्याच्या कणसाचा मुख्य हंगाम आहे. या काळात पांढरा, गावठी मका बाजारात येत असतो. काही वर्षांपासून हा पांढरा गावठी मका शेतातूनच हद्दपार झाला असल्याने बाजारात आता वर्षभर पिवळ्या मक्याची कणसे अर्थात 'स्वीट कॉर्न' पाहायला मिळतात. काहीसा पांढरा असणारा मका हा गावठी कणीस म्हणून ओळखला जातो. हा कणीस केवळ पावसाळ्यातच पाहायला मिळतो. या काळात त्याला जास्त मागणी असते.


 सध्या किरकोळ बाजारात एक कणीस १० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे कणसे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. पावसाळ्यात मक्याचे कणसे भाजून ‘भुट्टा’ खाण्याला नागरिकांची पसंती असून भाजलेला भुट्टा विक्रीसाठी शहरात विविध ठिकाणी भुट्टा विक्रेत्यांची हातगाडी दिसून येत आहे. हा भुट्टा खाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या बाजारात भुट्टा १५ ते २० रुपयांना मिळत आहे.


 
थोडे नवीन जरा जुने