सीकेटी महाविद्यालयात स्वायत्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन









सीकेटी महाविद्यालयात  स्वायत्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे प्रथम, द्वितिय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवार दिनांक १३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११:३०वाजता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व.चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केला आहे.

          


या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. राजन वेळूकर व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहणार आहेत.



या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख , पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सीता पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, संजय भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे व संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे . या सोहळ्यामध्ये सर्व पालक व विध्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. एस.के.पाटील यांनी केले आहे.







थोडे नवीन जरा जुने