कामोठे मधील समस्या सोडवण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पुढाकार


कामोठे मधील समस्या सोडवण्यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा पुढाकार
पनवेल दि.०८ (संजय कदम) : शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणी २०% राजकारण या सुत्रास अनुसरुन कामोठे मधील विविध समस्यांसंदर्भात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे शहरउपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे यांनी पनवेल महापालिकेचे कामोठे विभागाचे अधिकारी अरविंद पाटील यांना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याबाबत मागणी केली आहे.या निवेदनात सचिन त्रिमुखे यांनी म्हटले आहे कि, कामोठे सेक्टर 34,35अणि 36 मधील खाडीकिनारी असलेल्या इमारतींचे खाडीच्या पाण्यापासुन संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत उभारावी किंवा खाडीलगत असलेल्या नियोजित रस्त्याचे काम पनवेल महानगर पालिका तातडीने सुरु करावे, विविध सेक्टरमधील खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करुन दुरुस्त करुन देण्यात यावेत, सर्वच सेक्टर मधील तुटलेल्या फ़ूटपाथची पाहणी करुन त्वरित दुरुस्ती कार्य सुरु करावे, सेक्टर 34,35अणि 36 अनेक मोकळ्या भुखंडांवर झाडेझुडपे गवत असल्याने अस्वछता वाढली असुन आजुबाजुच्या इमारतींमधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे सिडकोने मोकळे भुखंडांची साफसफाई करावी, रस्त्याच्या मधे असलेल्या दुभाजकांची स्वच्छता करुन झाडांची व्यवस्थितपणे निगा राखण्यात यावी, ओवरफ़्लो होत असलेल्या ड्रेनेज लाईन्सची दुरुस्ती करण्यात यावी, या सारख्या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. पनवेल महानगर महापालिकेने ह्या विषयावर खंबीर पणे विचार करून लवकरात लवकर काही अडचणी असतील ते बघून लवकरात लवकर काम पूर्ण करावीत कामोठेच्या रहिवाशींना आपण दिलासा द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सचिन त्रिमुखे यांनी केली आहे. हे निवेदन शिवसेना उपशहर प्रमुख कामोठे शहर सचिन मनोहर त्रिमुखे यांनी अरविंद पाटील यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक संतोष गोळे, विभाग प्रमुख बबन गोगावले, गणेश कोकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.फोटो : निवेदन देताना सचिन त्रिमुखे व इतर पदाध
थोडे नवीन जरा जुने