तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू


तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू  
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः पनवेलजवळील खारघरमधील खुटुकबंधन गावासमोरील तलावात मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
सुलेमान खान (वय-18) असे या तरुणाचे नाव आहे. तळोजा फेस 2 परिसरात राहणारा सुलेमान खान शनिवारी आपले दोन मित्र दीपक कुमार, अरमान खानसह खारघर सेक्टर-36 मधील खुटुकबंधन गावासमोरील तलावात पोहोण्यासाठी गेला होता. सुलेमानसोबत असलेले दोन्ही मित्र यातील कोणालाही पोहता येत नव्हते. तरीही तलावात उतरून पोहण्याचा आनंद घेत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सुलेमानचा बुडून मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले दोन मित्र बचावले. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सोबत असलेल्या मित्रांनी याबाबतची माहिती सुलेमानच्या घरच्यांना दिली. घरच्यांनी खारघर पोलीस ठाण्यात फोन करून झालेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने बुडालेल्या सुलेमान खान शोध सुरू केला. अग्निशमन दलाच्या बचाव कार्याने दोन तास अथक प्रयत्नाने मृतदेह शोधून बाहेर काढला.


थोडे नवीन जरा जुने