पनवेल (प्रतिनिधी)भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थाची पाककला स्पर्धा राबवली तर मिलेट धान्य घरोघरी पोहचेल आणि आपला देश अधिक सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खारघर येथे आयोजीत पाककला स्पर्धेवेळी केले. भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने रविवारी खारघर येथे मिलेट अर्थात भरड धान्य पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेचे उद्घाटन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते झाले. या पाककला स्पर्धेत चैतन्य शेवाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पारितोषक देऊन गौरविण्यात आले.
कोणत्याही पदार्थाची चव ही तो पदार्थ बनविणान्याच्या हाताची असते हे जितके खरे तितकेच हेही खरे की पदार्थ बनविणान्याच्या मनातून ती चव पदार्थात उतरते. पाककला म्हणजे रुचकर, चविष्ट आणि पोषक पदार्थ बनविण्याची कला किंवा शास्त्र आहे. ही कला जमायला या कलेचा गोडी लागायला हवी आणि त्याचा ध्यास घ्यायला हवा, कारण कोणताच पदार्थ एकदा करून त्यात प्राविण्य मिळवता येत नाही. तो जेव्हा पुन्हा पुन्हा केला जातो त्याचवेळी त्यातील बारकावे लक्षात येतात आणि मगच तो प्रत्येकवेळी उत्तमोत्तम बनत जातो.
त्या अनुषंगाने भाजप महिला मोर्चा उत्तर रायगडच्यावतीने मिलेट अर्थात भरड धान्य पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चैतन्य शेवाडे, द्वितीय क्रमांक वर्षा शिवणेकर आणि तृतीय क्रमांक कल्पना गुप्ता यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यास्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ६० हून अधिक पाककला सादर करण्यात आल्या.
यावेळी इंटरनॅशनल शेफ विष्णू मनोहर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, न्युट्रिशन अंजू प्रसाद, जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, केंद्रीय समन्वयक संध्या शारबिद्रे, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, प्रविण पाटील, माजी नगरसेविका अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, राजश्री वावेकर, जिल्हा सोशल मीडिया संयोजिका मोना आडवाणी, खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, प्रभाकर जोशी,
खारघर तळोजा महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, कामोठे महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, परीक्षक गौरी जोशी, स्वाती कल्याणकर, सुषमा पोतदार, अंकिता वारंग, कांचन बिर्ला, नीलम विसपुते, शामला सुरेश, सीमा खडसे, सुमित्रा चव्हाण, स्नहेल बोचाई, निर्मला यादव, स्मिता आचार्य, नूतन सिंग, मीनाक्षी अंथवाल, यशोदा रावत, दुर्गा देवी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, मिलेट पदार्थाचे सेवन केल्याने आपण स्वास्थपुर्ण राहू शकतो आणि अनेक व्याधीपासून दूर राहू शकतो असे प्रतिपादन करून अश्याच प्रकारचे उपक्रम राबवावे असे आवाहन केले.
Tags
पनवेल