वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केली डुंगी व इतर विमानतळ लगत गावाची पाहणी








वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केली डुंगी व इतर विमानतळ लगत गावाची पाहणी
पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी डुंगी व विमानतळ लगत गावांना भेट देऊन पाहणी केली.



डुंगी गावात दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वपोनि नितीन ठाकरे यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून पुराच्या पाण्याची समस्या व विमानतळ लगत गावच्या समस्या याबाबत पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी डुंगी व विमानतळ लगत गावांना भेट देऊन पाहणी केली


. यावेळी त्यांनी सिडकोतर्फे पाणी निचरा होण्यासाठी लावण्यात आलेल्या सक्शन पम्प तसेच कामाची पाहणी केली. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळ परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुसळधार पावसात पाण्याचा साठा होऊ नये म्हणून घेण्याच्या काळजी व सूचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव, किरण सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते


थोडे नवीन जरा जुने