कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्हयातील 02 आरोपींकडून 12 गुन्हयांची उकल


कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्हयातील 02 आरोपींकडून 12 गुन्हयांची उकल 
12,16,421/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल, दि.5 (संजय कदम) ः कक्ष 3 गुन्हे शाखेकडून घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केल्याने त्यांच्याकडून 12 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे व जवळपास 12 लाख 16 हजार 421 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत बेलापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अज्ञात इसमांनी घरफोडी चोरी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन व इतर वस्तू असा एकुण 07,50,000/- रू कि.चा मुद्देमाल चोरी झाले बाबत दिलेल्या तक्रारीवरून बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) अमित काळे, सहा. पोलीस आयुक्त, गजानन राठोड, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे कक्ष 3, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल देवळे, सपोनि ईशान खरोेटे, पोउपनिरी आकाश पाटील, पोउपनि सुशील मोरे, अंमलदार पोहवा मोरे, पोहवा पाटील, पोहवा पाटील (तांत्रीक तपास), पोहवा सचिन धनवटे, पोहवा पाटील, पोना राजेश मोरे, पोशि सावंत, पोशि तांदळे, पोना सोनवलकर आदींच्या पथकाने गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच बातमीदार यांचेकडून प्राप्त माहिती व तांत्रिक तपास या आधारे वर नमुद दाखल गुन्हयात आरोपी हैदर अनारुल शेख कळवा, ठाणे, व युसुफ नुर इस्लाम शेख वय 26 वर्षे, मुंब्रा जि.ठाणे यांचा सहभाग निष्पन्न झाला. आरोपी गुन्हा केल्यानंतर त्यांचे मुळ गावी मुर्शिदाबाद, पश्‍चिम बंगाल या ठिकाणी रेल्वेने पळून जाण्याचे प्रयत्नात असताना त्यांना वर्धा रेल्वे स्टेशन येथे गितांजली एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे केलेल्या तपासात एकूण 12 गुन्हे उघडकीस आले त्यामध्ये पनवेल शहर, सीबीडी, कळवा, ठाणे लोहमार्ग, कोपरखैरणेे, एनआरआय, सानपाडा, रबाळे आदी परिसरातील गुन्हे उघडकीस आले आाहेत. व त्यांच्याकडून जवळपास 12 लाख 16 हजार 421 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


थोडे नवीन जरा जुने