पनवेल दि.०६ (वार्ताहर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात पनवेल शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते असे चित्र संपूर्ण पनवेल परिसरात दिसून येत आहे. पनवेल महानगर पालिकेच्या या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी आज पनवेल शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेकडून खड्ड्यांचा विशेष सत्कार करून पनवेल महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा सल्लगार शिरीष बुटाला, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शहर प्रमुख प्रवीण जाधव, संघटक राकेश टेमघरे, ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख कुणाल कुरघोडे, उपशहर प्रमुख सुजन मुसलोडकर, विभाग प्रमुख अमित माळी, संकेत बुटाला, युवासेना महेश भिसे, उपविधानसभा अधिकारी जितेंद्र सिंधू, नवीन पनवेल शहर युवासेना निखिल भगत, शहर प्रमुख युवासेना साई पवार, शहर समन्वयक सतीश पाटील, उपशहर युवासेना अमेय ठाकरे, विभाग प्रमुख कुणाल नाईक, ग्राहक कक्ष उपविभाग अक्षय तांबोळी यांच्यासह शिवसैनिक व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या भोवताली रांगोळी काढून तसेच त्या खड्ड्यांवर फुलांचा वर्षाव करीत पनवेल महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला.
Tags
पनवेल