पेठ गाव जवळील नदीत आढळला युवकाचा मृतदेहपेठ गाव जवळील नदीत आढळला युवकाचा मृतदेह 
पनवेल दि २७ (वार्ताहर) पनवेल तालुक्यातील पेठ गावाजवळील नदीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला असून यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी दिनांक २६/ ८/ २०२३ रोजी सदर मुलाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्या मुलाचे कायदेशीर रखवालीतून पळून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली होती.                कु. तन्मय आशिष मानकामे (वय १४ वर्ष ३ महिने) रा. पेठ गाव असे या मुलाचे नाव असून या तक्रारी नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्नील केदार व पोउपनि किरण वाघ व गुन्हे शाखेचे पोउपनि अभय शिंदे आणि त्यांचे पथक त्याचा शोध घेत असताना सदर मुलाचे कपडे गावातील नदीच्या काठी मिळून आल्याने पनवेल महानगर पालिका अग्निशामक दलाचे पथक, नवीन पनवेल अग्निशामक दलाचे पथक व ग्रामस्थांनी सदर मुलाचा नदीत शोध घेतला असता त्याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. त्यानुसार सदर मृतदेह पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन या बाबत अधिक तपास पोउपनि किरण वाघ करीत आहे.


थोडे नवीन जरा जुने