पनवेल दि. २७ ( संजय कदम ) : पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून बबन पाटील रागयङ जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत आज तळोजा फेज १|२ च्या परिसरातील डॉक्टरांसह व्यापारी आणि युवा मुस्लिम बांधवांनी जाहीर प्रवेश केला
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रायगड बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील , पनवेल महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे , विभाग प्रमुख गणेश म्हात्रे , विभाग प्रमुख मिथुन मढवी , मा.सरपंच लहु पाटील , युवासेना तेजस पाटील, विघ्नेश मुंबईकर, कुंदन मुंबईकर आदींच्या उपस्थितीत तळोजा फेज १|२विभागातील नामांकित डॉक्टर , व्यापारी आणि युवा मुस्लिम बांधव यामध्ये नियाज उद्दिन अंसारी,मोहमद युसुफ शेख,सय्यद बाबर मासुम शहा,अहमद चौधरी,शब्बीर मेमन, ईरफान अहमद खान, फजुलु रहेमान खान, सय्यद परिवाज शौकत, शिबली अंसारी, ङाॅ.नुमान खान, रहेमानभाई यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रायगड बबन पाटील यांनी भगवी शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले व आगामी काळात त्यांना पक्षाच्या माध्यमातून योग्य न्याय व यांच्या अडीअडचणी व समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले .