पनवेल दि. २७ ( संजय कदम ) : महाराष्ट कुष्ठपीडित संघटनेच्या वतीने १२ ए + ८० जी प्रमाणपत्र प्रकाशन सोहळा शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे संपन्न झाला .
महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे मा. नगरसेवक व महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे सल्लगार ऍड . मनोज भुजबळ , विरोधी पक्ष नेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका राजेंद्र काटे , आरोग्य राज्य स्तरीय समितीचे उदय ठक्कर ,महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष भूपाल फिरंगाणे ,उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण , सचिव अशोक आंबेकर , उपसचिव संतोष गाडेकर ,खजिनदार शफी शेख ,अँपल स्टेट लीडर रसूल मुल्ला ,सूत्रसंचालक लहू सावंत आदींच्या उपस्थितीत १२ ए + ८० जी प्रमाणपत्र प्रकाशन सोहळा संपन्न झाला . यावेळी महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Tags
पनवेल