कळंबोलीतील खड्डे डांबरीकरण करण्याची मा.नगरसेवक रवींद्र भगत यांची आयुक्तांकडे मागणी

कळंबोलीतील खड्डे डांबरीकरण करण्याची मा.नगरसेवक रवींद्र भगत यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल दि.३०(संजय कदम): कळंबोली वसाहतीमध्ये रस्त्याना पडलेल्या खड्ड्यांचे तातडीने डांबरीकरण करावे अशी मागणी मा नगरसेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  या निवेदनात रवींद्र भगत यांनी म्हंटले आहे की, कळंबोलीत रस्त्या संदर्भात सातत्याने निवेदन, आंदोलन, बैठका, व कळंबोली मध्ये बेमुदत उपोषण करून देखील रस्त्यांची अवस्था अद्यावत करण्यात आली नाही. महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे परंतु ते खड्डे खडी, दगड व पावडरच्या साह्याने भरले जात आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अशा पद्धतीचे खड्डे भरणे म्हणजे घरच्या अंगणात शेणाने सारवणे अशा प्रकारे तात्पुरता स्वरूपाचा काम चालू आहे. ज्याने पैसा पाण्यात जाणार आहे. तेव्हा सदर खड्डे डांबरीकरांच्या साह्याने गणेश उत्सवाच्या आगमना अगोदर कळंबोली खड्डामुक्त डांबरीकरण करून यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 


थोडे नवीन जरा जुने