मैत्रेय प्राणिक हीलिंग सेंटरच्या माध्यमातून प्राणिक हीलिंग उपचार संबधी माहिती आणि हीलिंगचा प्रत्यक्ष अनुभव उपक्रममैत्रेय प्राणिक हीलिंग सेंटरच्या माध्यमातून प्राणिक हीलिंग उपचार संबधी माहिती आणि हीलिंगचा प्रत्यक्ष अनुभव उपक्रम
पनवेल दि.३०(वार्ताहर): मैत्रेय प्राणिक हीलिंग सेंटरच्या माध्यमातून प्राणिक हीलिंग उपचार संबधी माहिती आणि हीलिंगचा प्रत्यक्ष अनुभव उपक्रम कार्यक्रम शहरातील गोखले सभागृहात आयोजित परिणीता सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रक्षाबंधन विशेष प्रदर्शनावेळी राबवण्यात आला.रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून परिणीता सोशल फाऊंडेशनच्यावतीने परिणीता शॉपी- रक्षाबंधन स्पेशल या प्रदर्शनामध्ये मैत्रेय प्राणिक हीलिंग सेंटर तर्फे प्राणिक हीलिंग उपचार संबधी माहिती आणि हीलिंगचा प्रत्यक्ष अनुभव उपस्थित स्टॉल धारकांना देण्यात आला.
      याबद्दल, सर्व स्टॉल धारकांनी समाधान व्यक्त केले आणि अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता दर्शविली. यावेळी परिणीता फाउंडेशनचे प्रशांत आणि साक्षी सागवेकर यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांना एकप्रकारे रक्षाबंधनची भेटच दिली. अशा प्रकारचा प्राणिक हिलिंगचा कार्यक्रम तुम्हालाही कोणत्या सोसायटी, मंडळ तसेच संघटनेसाठी करायचा असेल तर आम्हाला संपर्क करा. हा कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून कोणतेही छुपे शुल्क घेतले जात नाही. अशी माहिती मैत्रेय प्राणिक हीलिंग सेंटरच्या मेघना संजय कदम यांनी दिली तसेच अधिक माहितीसाठी 8369765907 येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले.  थोडे नवीन जरा जुने