कळंबोली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांचा केक कापून केला झाडांचा वाढदिवस साजरा.
पनवेल:( प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि रक्षण आपले कर्तव्य मानून स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी
कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार परिसरात वृक्षारोपण केलेल्या झाडांचा मंगळवारी उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा केला. अनोख्या पद्धतीने केलेल्या वाढदिवसाला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संवर्धनामध्ये विशेष रुची असलेल्या रामदास शेवाळे प्रतिष्ठान व छत्रपती एकता गृप लोखंड बाजार कळंबोली च्या अनेक पर्यावरण प्रेमीनी लोखंड पोलाद बाजार व कळंबोली परिसरात विविध वृक्षारोपण केले आहे. आठ वर्षापूर्वी रोपण केलेल्या रोपांचे मोठ्या वृक्षात रुपांतर होऊ लागले आहे. त्याचा आनंद प्रत्येक पर्यावरणप्रेमीची चेहऱ्यांवरुन ओसंडून वाहत होता. यावेळी रामदास शेवाळे यांच्याहस्ते केक कापल्यानंतर वृक्षांना सेंद्रिय खत देण्यात आले. या वेळी झाडांची निगा राखणार्यां वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच वृक्षांच्या संगोपनासाठी तत्पर असणाऱ्या शिवछत्रपती एकता गृप च्या सदस्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.यावेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके, शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, शंकर विरकर माजी नगरसेवक राजुशेठ शर्मा, लहूशेठ मकमिर विराट पवार, सुधिर ठोंबरे,ओमकार बळीप,वैभव लोंडे,दिपक कारंडे,प्रेम गोडसे,पंकज सुर्यवंशी,दीपक भोसले, बाळू राऊत,विठ्ठलशेठ नेवसे,भानुदास भोसले,अंकुश गायकवाड,त्रिंबक आडसुळ,सुनिल ननावरे, लाला धायगुडे, किसन भोसले,दत्ता शिंदे उपस्थित होते.
कोट
पर्यावरण संरक्षणासाठी
वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. त्याच बरोबरच लावलेले वृक्षसंवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. आजच्या काळामध्ये प्रदूषण आणि ग्लोबर वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे.भविष्यात वृक्ष टिकले नाहीत तर आपणही टिकणार नाही. मुलांप्रमाणे झाडांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाबरोबर राहण्यासाठी वृक्षलागवड ही सुवर्णसंधी आहे.
Tags
पनवेल