मोरा हायस्कूलमध्ये उरण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न.

मोरा हायस्कूलमध्ये उरण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न.उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,मोरा येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव जयवंत मढवी यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी मोरा शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जयविंद्र कोळी ,संकुलाचे सभापती परशुराम कोळी,चंद्रकांत कोळी,दिलीप मुंबईकर, आर . के. पाटील ,किरण शिंगटे ,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर , प्राथमिक मुख्याध्यापक साईनाथ गावंड,तालुका क्रीडा समन्वयक श्री. टेमकर सर तसेच तालुक्यातील सहभागी शाळांचे सर्व मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे क्रीडाशिक्षक अनिल पाटील सर यांनी केले तसेच या स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे शिक्षक म्हात्रे सर, नागमोती सर, शिंदे मॅडम, मुंबईकर मॅडम,पाटील मॅडम, श्रीमती घरत मॅडम, सुगिंद्र म्हात्रे, राणी जांभळे , घनश्याम म्हात्रे, दिनेश पाटील या सर्वांनी सहकार्य केले.


थोडे नवीन जरा जुने