डिजीटल युगातही श्री केशवराज प्रासादिक भजन मंडळाची यशस्वी वाटचाल.






डिजीटल युगातही श्री केशवराज प्रासादिक भजन मंडळाची यशस्वी वाटचाल.

उरण दि. 3 ( विठ्ठल ममताबादे ) आजचा जमाना सोशल मिडियाचा आहे.हे डिजीटल युग आहे.सर्वत्र डिजिटल युगाचा बोलबोला असताना 21 वे शतक विज्ञानाचे युग असताना हजारो वर्षाची परंपरा असलेले भजन हा अध्यात्मातील प्रकार आजच्या धकाधकीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगातही अस्तित्व कायम टिकून आहे. भजन मंडळाच्या अनेक मंडळापैकी उरण मधील श्री केशवराज प्रासादिक भजन मंडळ उरण यांची आजच्या डिजिटल युगातही यशस्वी घोडदौड सुरु आहे.



श्री केशवराज प्रासादिक भजन मंडळ उरण हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध भजन मंडळ आहे. या भजन मंडळाने नुकतेच मुरुड (दापोली रत्नागिरी) येथील श्री दुर्गादेवी मंदिरात भजनसेवा सादर केली. सदर भजन मंडळाचे सदस्य अत्यंत शिस्तबद्ध आणि योग्य गणवेशात असलेले पाहावयास मिळाले. श्री केशवराज प्रासादिक भजन मंडळ उरणचे भजन ऐकून तिथे फिरण्यास आलेले पर्यटक व ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले.





सर्व श्रोत्यांनी पखवाज वादक कु . सनी मांडेलकर आणि तबला वादक आकाश थळी यांची स्तुती केली.सदर मंदिरात भजन आयोजित करणारे प्रबोध जोशी यांनी भजनसेवेची संधी दिल्याबद्दल दामोदर गांगल आणि वसंतबुवा मांडेलकर यांनी आयोजकांचे आभार मानले. कोणताही स्वार्थ न ठेवता, सामाजिक बांधिलकीतून श्री केशवराज प्रासादिक भजन मंडळ कार्यरत आहे.भजनाच्या माध्यमातून अध्यात्मचा प्रसार व प्रचार करणे, जनतेला, नागरिकांना भजनाची आवड लावने, अध्यात्मिक जनजागृती करणे हा या भजन मंडळाचा प्रमुख उद्देश आहे.भजनाची आवड असलेल्या व्यक्तींना कोणत्याही सण, कार्यक्रम प्रसंगी जर त्यांच्या घरी भजन करावे अशी ईच्छा असेल तर त्यांनी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दामोदर गांगल - 9930091117, वसंतबुवा मांडेलकर - 9969513373


थोडे नवीन जरा जुने