पार्श्व वुमेन्स फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या आणि संजय जैन मित्र मंडळातर्फे बार्न्स शाळेत रोपांचे वाटप


पार्श्व वुमेन्स फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या आणि संजय जैन मित्र मंडळातर्फे बार्न्स शाळेत रोपांचे वाटप
पनवेल दि.०९ (संजय कदम) : पार्श्व वुमेन्स फाऊंडेशनने पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या रोटरी क्लब आणि संजय जैन मित्र मंडळाच्या सहकार्याने बार्न्स शाळेत रोपांचे वाटप करण्यात आले. 


                ‘हरा भरा रहे पनवेल हमारा’ या उद्देशाने पार्शव वुमेन्स फाऊंडेशन तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या आणि संजय जैन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील बार्न्स शाळेत रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी पार्श्व वुमेन्स फाऊंडेशनच्या सदस्या बसंती जैन, शीतल ठक्कर, भूमिका परमार, नेहा गांधी, मनाली परमार, रीना परमार, निशा जैन, कल्पना जैन, पायल कोठारी, प्रिती मुनोथ, आकांशा बंठिया, काजल धेडिया, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष डॉ. जय भांडारकर आणि संजय जैन मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय जैन, पत्रकार संजय कदम आदी उपस्थित होते. बार्न्स शाळेच्या प्राचार्य शुभा भगत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले


थोडे नवीन जरा जुने