वृद्ध मातेसह मुलगा बेपत्ता


वृद्ध मातेसह मुलगा बेपत्ता
पनवेल दि ०५ (संजय कदम) : ६० वर्षीय वृद्ध मातेसह ३१ वर्षीय मुलगा कळंबोली वसाहतीतील राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याने ते दोघे जण हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


           संतोषीदेवी शंकरलाल रांका (वय ६०) रंग गोरा, चेहरा गोल, केस काळे - पांढरे, डोळे काळे, नाक सरळ, कपाळाला लाल रंगाची बिंदिया, कानात कर्ण फुले, डोळ्यावर चष्मा, हातामध्ये बांगड्या आहेत सोबत त्यांचा मुलगा आशिष शंकरलाल रांका उर्फ मोटू (वय ३१) रंग सावळा, चेहरा उभा, केस काळे पांढरे, समोर थोडे टक्कल पडलेले, दाढी बारीक, नाक सरळ, डोळे काळे असून गळ्यात धागा आहे तसेच कानात काळ्या रंगाचा हेडफोन, सोबत कपड्याची बॅग, सोबत मोबाईल आहे हे दोघे राहणार साईधाम सोसायटी कळंबोली असे आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे फोन नंबर - ०२२-२७४२३००० किंवा पोलीस नाईक सचिन हराळे यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने