द्रोणागिरी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर







द्रोणागिरी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर


उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटिल यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण मतदार संघातील द्रोणागिरी शहरातील शिवसेना पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केले आहेत




 यामध्ये रुपेश पाटील यांची द्रोणागिरी शहराच्या सेक्टर 47 व 51 सेक्टर च्या विभाप्रमुख पदी व सेक्टर 54 च्या युवासेना शाखाअधिकारी पदी कु स्वस्तिक संदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या सर्वांना रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नियुक्ती पत्र देऊन संघटना बांधणीसाठी व पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या आहेत.



यावेळी उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, उद्योगपती दयालशेठ भोईर,सचिव धनंजय शिंदे, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, युवासेना उपतालुका अधिकारी निशांत घरत, द्रोणागिरी शहर आधिकारी करण पाटील, सोशल मीडियाचे नितीन ठाकूर, जेष्ठ कार्यकर्ते केशव घरत, द्रोणागिरी शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने