सिडकोच्या अधिकाऱ्यांचा वडघर येथील आदिवासी व मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांवर अन्याय; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सिडकोला जाब विचारणा


सिडकोच्या अधिकाऱ्यांचा वडघर येथील आदिवासी व मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांवर अन्याय; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सिडकोला जाब विचारणा
पनवेल दि. १२ ( वार्ताहर ) : पनवेल जवळील वडघर येथील नामदेव वाडी येथील घरे सिडकोने निष्कासित केली. त्यामध्ये महेश लक्ष्मण साळुंखे, बळीराम थप गदिर, कुरमन बारक्या वाडू व इतर जयश्री विजय पाटोळे, लक्ष्मीबाई लाडकं म्हसे यांची राहती घरे सिडकोने निष्कासित केली. त्यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुमचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तुम्हाला भूखंड वितरीत केले जातील. परंतु त्यांना सद्यस्थितीत वेगळ्याच ठिकाणी भूखंड वितरीत केल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे तरी याबाबत सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिला आहे .याबाबत त्यांनी सिडको मुख्य भूमी व भूमापन अधिकारी यांना निवेदन दिले आहे .
     या निवेदनात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी म्हंटले आहे की ,पूर्वीच्या भूखंड वाटपाबाबत बोलताना सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले होते की,तुमचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तुम्हाला भूखंड वितरीत केले जातील.परंतू काही कालावधीने सिडकोने भूखंड वाटप करताना सांगितले की, सदर जागेवर लिटिगेशन असल्यामुळे या ठिकाणी भूखंड देता येणार नाही. तुम्हाला पर्यायी भूखंड R-4/203F येथे भूखंड वितरीत करण्यात आला आहे 
. हा भूखंड स्मशानभूमीला लागून आहे, तसेच या भूखंडातून हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी च्या वायर जात असल्यामुळे कोणताही बांधकाम व्यावसायिक या ठिकाणी बांधकाम करण्यास इच्छूक नाही त्यामुळे ज्यांची घरे निष्कासित झाली आहेत ते आदिवासी मागासवर्गीय व गोरगरीब नागरीकांचे आर्थिक हाल सुरु झाले आहेत व या सर्व गोरगरीब जनतेची आता उपासमार सुरु झालेली आहे. सिडकोच्या अधिकान्यांनी सुरुवातीला शासनाचे लिटिगेशन असल्याचे सांगितले परंतु आता त्याच जागेवर १९० स्वेअर मीटरचा भूखंड इतर शेतकऱ्याला दिला आहे. अश्या प्रकारे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासी, मागासवर्गीय गोरगरीब जनतेची संगनमताने फसवणूक केलेली आहे . त्या विरोधात लवकरच महेश साळुंखे यांनी जनआंदोलन उभे करण्याचे ठरविले आहे.


थोडे नवीन जरा जुने