पनवेल परिसरात प्लास्टिकचा सर्रास वापर; महानगरपालिकेचे दुर्लक्ष







पनवेल परिसरात प्लास्टिकचा सर्रास वापर; महानगरपालिकेचे दुर्लक्ष
पनवेल दि.२६(वार्ताहर): गेल्या काही महिन्यांपासून पनवेल परिसरातील अनेक छोटे मोठे व्यवसायीक शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा व इतर वस्तूंचा सर्रासपणे वापर करत असून, याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती. परंतु सदर मोहीम थंडावल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.



      निसर्गाला हानीकारक असणाऱ्या एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे हा स्वच्छ सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा भाग आहे, मात्र असे असूनही प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर शहरात सुरू आहे. त्यामुळे महापालिकेकडून ठिकठिकाणी कारवाई करून दंडात्मक वसुली करण्यात येत होती. पनवेलकरांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा तसेच पर्यायी कापडी व कागदी पिशव्यांचा प्राधान्याने वापर करावा याविषयी महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली होती. तरीही अनेक ठिकाणी दुकानदार, फास्ट फूड सेंटर, भाजी फळ विक्रेते, व इतर व्यवसायिक सुद्धा बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रासपणे वापरकरताना दिसत आहेत. तरी पनवेल महानगरपालिकेने थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु करावी अशी मागणी पनवेलकर करत आहेत.


थोडे नवीन जरा जुने