कामगार नेते सुधीर घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.


कामगार नेते सुधीर घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.
उरण दि.8( विठ्ठल ममताबादे) उत्तम राजकीय नेते, समाजसेवी व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व तसेच कामगार नेते म्हणून सुपरिचित असलेले सुधीर घरत यांचा 51 वा वाढदिवस शनिवार दि 5 ऑगस्ट 2023 रोजी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.नवघर येथे सुधीर घरत यांच्या निवास स्थानी माधवबाग तर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या महाआरोग्य शिबीरात अनेक रुग्णांनी विविध रोगांची तपासणी करून घेतली. जिल्हा परिषद शाळा नवघर येथे वह्या वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.आदिवासी आश्रमशाळा चिरनेर येथे अन्नदान करण्यात आले. अशा प्रकारे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरणच्या माध्यमातून कामगार नेते सुधीर घरत यांचा 51 वा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पी.जे.पाटील उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा,दौलतशेठ घरत भाजप नेते,नीलकंठ घरत भारतीय जनता पार्टी ज़िल्हा उपाध्यक्ष,चंद्रकांत घरत भारतीय जनता पार्टी ज़िल्हा चिटणीस,सुरेश पाटील कामगार नेते तथा ज़िल्हाध्यक्ष भारतीय मजदूर संघ,दीपक ठाकूर सदस्य उरण पंचायत समिती,विकास नाईक तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष,महादेव बंडा शेकाप नेते,दिनेश घरत कामगार नेते,सुदीप पाटील उद्योगपती,दिनेश बंडा उपसरपंच नवघर ग्रामपंचायत,मधुकर पाटील ज़िल्हा उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ,राजेंद्र घरत उद्योगपती,कुंदन कडू सदस्य नवघर ग्रामपंचायत,योगेश तांडेल,जयप्रकाश पाटील,जयप्रकाश भोईर,अजित पाटील,संकेत कडू,नितीन पाटील,हरेश बंडा,ज्ञानेश्वर भोईर, अमित जोशी, भूपेंद्र कडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनेक व्यक्तींनी प्रत्यक्ष तर अनेक व्यक्तींनी व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कामगार नेते सुधीर घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.थोडे नवीन जरा जुने