आदर्श शिक्षिका अन्विता घरत यांनी राबविला शैक्षणिक उपक्रम.







आदर्श शिक्षिका अन्विता घरत यांनी राबविला शैक्षणिक उपक्रम.


उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )
जग हे फार सुंदर आहे परंतु पाहण्याचा दृष्टिकोन हवा. आपण जेथे वावरतो जेथे अनुभव घेतो व ज्या चिमुकल्याच्या शालेय सभोवताली त्यांच्यात वावरून तसेच त्यांच्या शिदोरीतुन जे अनुभव घेतलं ज्या शाळेत आपण सेवा दिली त्या रा जि प शाळा आवरे चे असंख्य असे ऋण आणि ऋणानुबंध आपल्यावर आहेत याची जाणीव ठेवून त्याचीच परतफेड म्हणून शैक्षणिक उपक्रम याचा भाग म्हणून शनिवार दिनांक 5/8/2023 रोजी रा.जि.प शाळा आवरे येथे



 शिक्षिका अन्विता घरत, अतिश घरत, अनवित घरत यांच्या तर्फे आवरे शाळेतील विद्यार्थ्यांना टाय,पट्टा वाटप करण्यात आला.या सदर प्रसंगी अन्विता घरत, अतिश घरत,अन्वित घरत यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश गावंड, उपाध्यक्ष सोमनाथ म्हात्रे, सदस्य शंकर पाटील,प्रमोद म्हात्रे, ,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील,संजीवनी पाटील अलका गावंड, माई म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे,प्रतीक्षा गावंड व शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटील ,निर्भय म्हात्रे,अहिरे सर ,कोळे मॅडम,पाटील मॅडम यांनी त्यांचे आभार मानले आणि सत्कार केला.घरत मॅडम या शाळेमध्ये गेली 6 वर्ष शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांची बदली झाली तरी त्यांचे आवरे शाळेवरती आणि मुलांवर प्रेम आहे म्हणून त्यांनी मुलांसाठी हे वाटप केले आहे असा हा सुंदर शैक्षणिक उपक्रम राबविण्याताना घरत मॅडम या शेवटी भाऊक झाल्या.


थोडे नवीन जरा जुने