आदिवासी बांधवांना अन्न धान्य वाटप करून केला आदिवासी दिन साजरा.







आदिवासी बांधवांना अन्न धान्य वाटप करून केला आदिवासी दिन साजरा.


उरण दि. 10 (विठ्ठल ममताबादे ) संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 रोजी 9 ऑगस्ट हा दिवस जागतीक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. आणि याच आदिवासी दिनाचे औचित्य साधून जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रीतम म्हात्रे व आदिवासी बांधवासाठी रात्रंदिवस झटणारे सामाजिक कार्यकर्ते,आदिवासी मित्र, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून अर्थातच केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून उरण तालुक्यातील चिरनेर येथील अक्कादेवी आदिवासी वाडी, माकडडोरा आदिवासी वाडी येथील बांधवाना तांदूळ, डाळ , गव्हाचे पीठ,साखर, चहा पावडर, मीठ बिस्कीट या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे तालुका सचिव अनिल घरत यांच्यासह केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




आदिवासी बांधवांच्या सुख - दुःखात त्यांच्या मदतीला धाऊन जाणारे खऱ्या अर्थाने आदिवासी मित्र - सखा म्हणून परिचित असलेले प्रितम म्हात्रे,राजू मुंबईकर हे नेहमीच या आदिवासीं समाजाच्या प्रगती करिता करत असलेले प्रामाणिक कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरणारं असचं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मात्र आदिवासीं बांधव आज ही उपेक्षितांचे जीवन जगत आहेत.




गरिबी,अज्ञान,निरक्षरता,बालमजुरी,बेरोजगारी अश्या अनेक समस्यांना आजही आदिवासीं बांधवांना तोंड द्यावं लागतं आहे त्यातच समाजात, प्रीतम म्हात्रे,राजू मुंबईकर आणि इतर काही यांसारखी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच काही व्यक्तिमत्त्व आहेत की ती या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या  आदिवासीं बांधवांना समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटतं आहेत, त्यांच्या करिता आशेचा किरण बनून उभे आहेत.आणि म्हणूनच आज हा समाज कुठेतरी स्वतःच्या हिंमतीवर,मेहनतीवर आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहताना दिसत आहे.




थोडे नवीन जरा जुने