अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू
पनवेल, दि.११ (संजय कदम) : पानटपरीवर पान आणणेकरीता उभ्या असलेल्या इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना पनवेल-पुणे महामार्गावर दांडफाटा येथे घडली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.               दांडफाटा परिसरात राहणारे प्रमोदकुमार यादव हे पनवेल-पुणे महामार्गावर असलेल्या पानटपरीवर पान आणणेकरीत आले असता कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, बेदरकारपणे वाहन चालवुन रोडचे बाजुला उभे असलेल्या प्रमोदकुमार यादव यास जोरदार धडक दिली. या धडकेत प्रमोदकुमार यादव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता एमजीएम हॉस्पीटल कामोठे येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर करीत आहेत. दरम्यान या अपघाताबाबत किंवा वाहनाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२४४४ किंवा पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर (मो.८०८७२५७७११) यांच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल तसेच रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने