मोबाईल खेचून दुकली पसार


मोबाईल खेचून दुकली पसार
पनवेल, दि.११ (संजय कदम) : एका पादचारी इसमाच्या पॅन्टच्या उजव्या खिशात असलेला मोबाईल दोन अज्ञात व्यक्तींनी मोटार सायकलवरुन येवून तो मोबाईल हिसकावून त्याला धक्काबुक्की करून पळून गेल्याची घटना तालुक्यातील तोंढरे गाव येथे घडली आहे

.
               दिपेन उरग (20) हा तोंढरे गाव ते उसटणे असे चालला असताना एनएमएमटी बस स्टॉपच्या जवळ मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्याला रस्त्यात अडवूून जबरदस्तीने त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशातून 13 हजार 300 रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला व त्यास धक्काबुक्की करून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने