खेळों इंडिया १० का दम स्टेट वोमन वुशू स्पर्धेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांनी भेट केले बक्षीस वितरण






खेळों इंडिया १० का दम स्टेट वोमन वुशू स्पर्धेला शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांनी भेट केले बक्षीस वितरण
पनवेल दि.२८(संजय कदम): शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कामोठे शहर येथे "खेलो इंडिया १० का दम" स्टेट वोमन वुशु कॉम्पीटीशन ही २ दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते नितीन नांदगावकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा समनव्यक विजय कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांनी भेट दिली तसेच बक्षिसे व पारितोषिक वितरण केले.


       यावेळी सर्व प्रमुख पाहुणे यांनी सर्वांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महानगर समन्वयक दिपक घरत, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, शहर समन्वयक बबन काळे, शहर संघटक संतोष गोळे, विभाग प्रमुख बबन गोगावले, महिला आघाडीच्या सौ. सुवर्णा वाळुंज आदी पदाधिकारी तसेच खेळाडू तसेच उपविभाप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने