सतीश गावंड सुप्रिया पाटील फसवणुकीबाबत ठेवीदारांच्या पाठी आता युवासेना सचिव रुपेश पाटील; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ठेवीदारांना न्याय देणारसतीश गावंड - सुप्रिया पाटील फसवणुकीबाबत ठेवीदारांच्या पाठी आता युवासेना सचिव रुपेश पाटील; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ठेवीदारांना न्याय देणार
पनवेल दि.२८(वार्ताहर): सतीश गावंड - सुप्रिया पाटील फसवणुकीबाबत ठेवीदारांच्या पाठीशी आता युवासेना सचिव रुपेश पाटील ठामपणे उभे असून ते मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ठेवीदारांना न्याय देणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.


    उरण पिरकोन गावातील सतीश गावंड व कॉप्रोली येथील सुप्रिया पाटील ह्याने जास्त पडतावा देतो सांगून अनेक ठेवीदारांचे करोडो रुपये घेऊन आता पोबारा केला आहे आणि गुंतुवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा लावला आहे. केत्येक महीने गेले, जमीन मिळाल्या नंतर पैसे मिळतील ह्या आशेवर नागरिक होते पण पैसे मिळाले नाहीत उलट एजंट बंगले बांधत आहेत, गाड्या घेत आहेत स्वतः गावंड मोठ्या हॉटेल मधे पार्ट्या झाडत आहे. अशावेळी फसवणूक झालेल्या सामान्य जनतेबाबत कोणही बोलत नव्हते, कोणी आपले दागिने गहाण ठेवून पैसे भरले, कोणी जमीन विकून कोणी बँक मधून लोन काढून पैसे भरलेत आणि आता फसवणूक ही झाली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर ही झालाय ह्या मुळे घरात भांडण, मुलांच्या शाळा कॉलेजांच्या फी भराव्या कशा-सण कसे साजरे करावे हा मोठा बिकट प्रश्न ठेवीदारांच्या समोर आहे, महिलांच्या गळ्यातील दागिने गेले, हातातले पैसे, बँकेतील ठेवी सतीश गावंड आणि सुप्रिया पाटील यांनी फसवून नेल्या आहेत. मग अशावेळी जीव द्यायचा की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हा पूर्ण उरण तालुका आर्थिक बाबतीत अनेक वर्षे पाठी गेला आहे. अशी परिस्थिती घराघरात असताना कोणी ह्या सामन्य जनतेचे पैसे परत कसे आणायचे ह्याबाबत बोलत नव्हते ना कोणी त्यांच्या परिस्थिती बाबत बोलत होते.


 मात्र त्याच विभागातील आणि नवी मुंबईत रहात असलेले मुख्यमंत्री निकटवर्तीय युवासेना राज्य सचिव रुपेश पाटील ह्यानी हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सांगितल्याने तातडीने ह्या तपासाला वेग आला आहे, काही अधिकाऱ्यांचे निलंबन झाले, कोर्टकडून जामीन रद्द झाला आहे आणि सतीश गावंड ह्याचे अटक वॉरंट निघाले आहे. लोकांचा पैसा घेऊन पसार झालेला सतीश गावंड आणि अटक असलेली सुप्रिया पाटील यांच्या कडून पैसे, मालमत्ता आणि सखोल चौकशी करुन मिळालेली संपत्ती ही फसवणूक झालेल्या जनतेला वाटावी ही प्रमुख मागणी ह्यावेळी केली आहे. ह्या साठी काल पिरकोन येथे रूपेश पाटील यांनी ठेवीदारांची बैठक लावली आणि ५००-६०० लोकांनी ह्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला. पैसे परत आणू, तुमचे प्रश्न समस्या शासनाला सांगू आणि लवकरात लवकर पैसा आणू ह्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. जन संघटन संघर्ष समिती ह्या समितीमार्फत ह्या सर्व मागण्या आणि जनतेला न्याय रुपेश पाटील मिळवून देणार आहेत. लोकांनी ह्याचे स्वागत केले असून फसवणूक झालेल्या लोकांनी एक फॉर्म भरून द्यायचा असे ठरले आहे. फॉर्म भरून आपली माहिती, फसवणूक झालेली रक्कम सांगायची आहे जेणेकरुन एकूण किती रक्कम फसवून हे आरोपी फरार आहेत ह्याची माहिती समोर येणार आहे. कोणतेही दडपण ना ठेवता फसवणूक झालेल्या जनतेने समोर येऊन हा फॉर्म भरुन हया समिती सोबत यावे असे आवाहन ह्यावेळी सर्व उपस्थितानी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने