मंदार काणे एंटरटेनमेंट आणि फ्लॉसम एंटरटेनमेंट आयोजित मंगळागौर स्पर्धेला रसिकप्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसादमंदार काणे एंटरटेनमेंट आणि फ्लॉसम एंटरटेनमेंट आयोजित मंगळागौर स्पर्धेला रसिकप्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद
पनवेल दि.२८ (संजय कदम): मंदार काणे एंटरटेनमेंट आणि फ्लॉसम एंटरटेनमेंट आयोजित फडके नाट्यगृह पनवेल येथे झालेल्या मंगळागौर स्पर्धेला रसिकप्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला आहे.


      या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून लोकमान्य बँक पनवेल शाखेचे व्यवस्थापक अरविंद कुदळे, मयूर निजामपूरकर आणि पटेल ज्वेलर्सच्या प्रतीक्षा व्यास, त्याचसोबत विशेष सहकार्य म्हणून ओरायन मॉल पनवेल , आचार्य ९० फेम, प्रिशा साडीजच्या अर्चना खरात, संजय पोतदार, पुना गाडगीळ ज्वेलर्स, माजी नगरसेवक नितीन पाटील, प्रथमेश चंद्रशेखर सोमण, गणेश पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर, नीता माळी, सुहासिनी केकाणे, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, नाट्यगृह व्यवस्थापक राजेश डोंगरे, लतिका मंदार काणे, कल्पना माने यांच्यासह सर्व नाट्यगृह कर्मचारी,सर्व पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सोनाली पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमामध्ये नवदुर्गा ग्रुप दिवा ठाणे यांचा प्रथम क्रमांक, समृद्धी महिला ग्रुप ऐरोली यांचा द्वितीय क्रमांक आणि माउली ग्रुप ऐरोली यांचा तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वाना अनुक्रमे कॅश मध्ये पाच हजार , तीन हजार आणि २ हजार रुपये त्याचसोबत ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचप्रमाणे तेजोमय ग्रुप पनवेल आणि सखी मंगळागौर ग्रुप पनवेल यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले याचसोबत साक्षी पेडणेकर, मिताली नाटेकर, संजना महेंद्र गोंधळी, गौरी पत्की आणि कुमारी सुप्रिया पाटील या ५ जणींना वयक्तिक बक्षिसे देण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश मोकल यांनी केले.थोडे नवीन जरा जुने