चोरीच्या दुचाकीचा पुन्हा एकदा शोध लावण्यास कळंबोली वाहतूक पोलिसांना आले यश.चोरीच्या दुचाकीचा पुन्हा एकदा शोध लावण्यास कळंबोली वाहतूक पोलिसांना आले यश.

 खांदेश्वर पोलीस ठ ठाण्याच्या हद्दीतून दिनांक 31/0 8/2023 रोजी चोरीस गेलेली दुचाकी ही कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीत कळंबोली सर्कल बाजूने एक्सप्रेसवे कडे जाणाऱ्या उड्डाणपुला चे पिलर खाली दोन दिवसापासून चिखलामध्ये बेवारस स्थितीत असल्याबाबत खाजगी क्रेन चालक श्री बिजय यादव यांनी कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर व पोलीस हवालदार अतुल शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानुसार पोलीस हवालदार शिंदे यांनी वपोनि हरिभाऊ बानकर यांना तात्काळ माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनानुसार सदर ठिकाणी समक्ष जाऊन गाडीची पाहणी केली असता, ग्रे कलर रंगाची दुचाकी मिळून आले व त्यास पाठीमागील नंबर दुमडलेला व पुढील नंबर हा चिखल लावलेला दिसून आला. सदर चिखल काढून नंबरची इ चलन मशीनद्वारे पाहणी केली असता त्यामध्ये असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता सदरची गाडी ही आसुडगाव येथून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेले असल्याचे व त्याबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे वाहन चालक श्री संतोष निरभवणे यांनी माहिती दिली.त्यानुसार त्यांना सदर वाहनाची ओळख परेड घेतले असता त्यांनी बरोबर माहिती दिली. काही वेळाने त्यांनी गुन्हा दाखल केल्याची प्रत व आरसी बुक तसेच इतर कागदपत्र घेऊन चौकीत आले व तसेच सदर बाबत खांदेश्वर पोलीस ठाणे येथे संपर्क केला असता नमूद वाहनाची चोरी झाल्याचे व गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार सदर वाहन हे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. एका महिन्यात दोन चोरीची वाहनांचा शोध लावण्यास कळंबोली वाहतूक शाखेला यश मिळाले आहे. आदरपूर्वक सविनय सादर


थोडे नवीन जरा जुने