तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : खारघर मधील ओवे गावातून बेकायदा राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी तीस वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समोर आले. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने केली आहे.
बादल मोइनोद्दीन खान, कलम खान, असीम शेख असे यातील आरोपींची नावे आहेत.ओवे गावात बेकायदा भारतात प्रवेश करून आलेले काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा लावून आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपी पैकी बादल हा तीस वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समोर आले आहे. बादल लहान असतानाच आपल्या पालकांच्या समवेत भारतात आला होता. तर अशाच प्रकारे असीम सुद्धा पालकांच्या समवेत पस्तीस वर्षांपूर्वी भारतात आलेला आहे. तर कमल हा २०१३ पासून भारतात आला होता. या बाबत अधिक तपास सुरु आहे.
Tags
पनवेल