मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. रमेश दादा गूडेकर व श्री. महेश सावंत यांच्या हस्ते रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला





मावळचे लोकप्रिय संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या पाठपुराव्याने परदेशी आळी येथील अष्टविनायक कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, रायगड जिल्हा सल्लागार श्री. रमेश दादा गूडेकर व श्री. महेश सावंत यांच्या हस्ते रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.* 



तसेच अशा प्रकारच्या विविध विकासकामांसाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. बरेच वर्ष दुर्लक्षित असलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन काम पूर्ण करून दिल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी खासदार साहेबांचे मनापासून आभार मानले.
तसेच परदेशी आळी येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन भोईर (धुमाळ) अस्थानात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.





सदर प्रसंगी शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, प्रसिद्धी प्रमुख तौफिक बागवान, प्रभाग 14 विभागप्रमुख आशिष पनवेलकर, शाखाप्रमुख अविनाश साफल्य, किरण पवार, प्रतीक वाजेकर, रोहित भोईर, युवासेना प्रभाग 18 विभागप्रमुख चिन्मय सोनावणे, प्रभाग 14 विभागप्रमुख रितेश पनवेलकर, शाखाप्रमुख अनिकेत जैस्वाल, ओमकार पनवेलकर व स्थानिक रहिवासी श्री संजय पाटकर, श्री. मयुरेश पाटकर, श्री. विजय पाटील, श्री. सदानंद सोमण, श्री. अनिरुद्ध भातखंडे उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने